भ्रष्ट्राचाराविरुद्ध 23 आंदोलन; आता उघड्यावर अंडरवेअर सुकवण्यावरून FIR दाखल!

भ्रष्ट्राचाराविरुद्ध 23 आंदोलन; आता उघड्यावर अंडरवेअर सुकवण्यावरून FIR दाखल!

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंडरवेअर सुकवत असल्याचा अजब आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) 22 सप्टेंबर : भ्रष्टाचाराविरोधात गेल्या 23 वर्षांपासून धरणावर बसलेल्या शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंडरवेअर सुकवत असल्याचा अजब आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे. महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरूद्ध कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खरंतर, आरोपी शिक्षक मागील 23 वर्षांपासून एका माजी आमदाराने केलेल्या जमीन हडपण्याच्या विरोधात निषेध मोर्चावर बसला आहे.

एसएचओ समीपाल अत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाविरूद्ध कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार नावाच्या एका अधिकाऱ्याने  ही तक्रार दाखल केली आहे. आरोपी शिक्षक विजयसिंह हा रोज सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंडरवेअर सुकवतो असं तक्रारीमध्ये लिहण्यात आलं आहे. त्यामुळे विजयसिंह यांनी शिक्षकाविरोधआत तक्रार दाखल केली आहे. संजय कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

इतर बातम्या- युती 100 टक्के होणार पण 'या' मुद्द्यावरून भाजप सेनेला झुकवणार!

यानंतर जिल्हादंडाधिकारी सेल्वा कुमारी यांनी शिक्षकाला बोलावून घेतलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेलं त्याचं सामान उचलण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून शिक्षकाचं सामान बाहेर फेकलं असून त्याच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. यानंतर शिक्षक विजयसिंह यांनी पुन्हा पोस्ट ऑफिसजवळील शिवचोक इथं धरणं सुरू केलं आहे. यावर 'मी पोलिसांच्या कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही. मी माझा निषेध यापुढेही कायम ठेवेल.' असं आरोपी शिक्षकाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर माझं आंदोलन संपवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले.

इतर बातम्या - आचारसंहिता लागू होताच मुंबई पोलिसांना सापडलं गभाड, दुकानातून 67 लाख जप्त!

अंडरवेअर सुकवण्यावरून माझ्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण ते अंडरवेअर माझं नसल्याचं शिक्षकाने म्हटलं आहे. ते जवळपास राहणाऱ्या लोकांचं आहे. भ्रष्टाचाराविरूद्ध गेल्या कित्येत वर्ष मी आवाज उठवला. त्यामुळे माझ्याविरोधात हे कृत्य केलं आहे असं विजयसिंह म्हणाले. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2019, 10:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या