Home /News /maharashtra /

हिंगोलीत तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोलीत तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

हिंगोली शहरातील एका तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रभारी गृह पोलीस उपाधीक्षक वसीम हाशमी यांच्यासह इतर पाच महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 2 जुलै : हिंगोली शहरातील एका तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रभारी गृह पोलीस उपाधीक्षक वसीम हाशमी यांच्यासह इतर पाच महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक तरुणाच्या कुटुंबीयांनी आक्रोश केल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हिंगोली शहरात राहणाऱ्या मृतक तरुणाने आरोपींच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वांसमोर बोलल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणावर आरोपींनी या तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनंतर 30 जून रोजी पुन्हा वाद झाल्यावर आरोपींनी या तरुणाला मारहाण आणि शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचदिवशी या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. (सर्वांना वेगवेगळ्या खोलीत थांबवलं, घरातील दिवे घालवले; मांत्रिकाने एक एक करीत वनमोरे कुटुंबातील 9 जणांना संपवलं) दरम्यान मयत तरुणाच्या संतप्त कुटुंबीयांनी पोलीस अधिकारी आणि इतर महिलांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर अखेर आज सकाळी प्रभारी गृह पोलीस उपाधीक्षक आणि इतर पाच महिलांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हिंगोलीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात दोन चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका शेतकऱ्याला गंडवून त्याचे तब्बल साडेचार लाख रुपये लंपास केले आहेत. वसमत तालुक्यातील विरेगाव येथील शेतकरी विठ्ठल बोंढारे हे वैयक्तिक व्यवहारासाठी मोटरसायकलच्या टाकीवरील कव्हरमध्ये पिशवीत चाडे चार लाख रूपये घेऊन शहरात आले होते. दोन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून जुने शहर भागात त्यांना गाठले आणि तुमचे पैसे खाली पडल्याचे सांगत दुसऱ्या चोरट्याने मोटरसायकलच्या टाकीच्या कव्हर मधील साडेचार लाख रुपये व एटीएम कार्ड असलेली पिशवी लंपास करून पोबारा केला आहे. दरम्यान त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे दोन्ही चोरटे कैद झाले असून पोलिस या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या