मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनसेला मोठा झटका, वैभव खेडेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मनसेला मोठा झटका, वैभव खेडेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रत्नागिरी, 2 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यातील मनसेचे पहिले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेसाठी हा खूप मोठा फटका मानला जातोय. वैभव खेडेकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकाराचे आरोप केले जात होते. खेडेकर यांनी सरकारी वाहनांच्या नावाने खासगी गाड्यांसाठी लाखो रुपयांचे डिझेल खरेदी केले, असा आरोप करण्यात येत होते. अखेर याच आरोपांप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. वैभव खेडेकर यांच्यावर शासनाच्या फसवणुकीप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. खासगी वाहनात त्यांनी शासकीय खर्चातून इंधन खरेदी केलं. शासकीय खर्चातून त्यांनी खासगी गाडीत पाच लाखांचं डिझेल खरेदी केलं, असा आरोप खेडेकरांवर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधाथ शासनाच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (महिन्याभरानंतर मिळाला मुहुर्त, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं, दीपक केसरकरांनी दिले स्पष्ट संकेत) विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी वैभव खेडेकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर झालेल्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांप्रकरणी त्यांना नगरविकास विभागाकडून अपात्र ठरवण्यात आलं होतं. खेडेकरांविरोधात तब्बल सहा वर्षांकरता निवडणूक न लढण्याचा आदेश नगरविकास विभागाने जारी केला होता. पदाचा नियमबाह्य वापर केल्याचा वैभव खेडेकर यांच्यावर ठपका लावण्यात आला होता. त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं. वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आहेत. तसेच मनसेचे ते संपूर्ण राज्यात एकमेव नगराध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जायचे. मात्र दोन वर्षांपूर्वी शिवसेना गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि नगर विकास मंत्रालयात खेडेकर यांच्याबाबत विविध भ्रष्टाचाराची प्रकरणाची तक्रार केली होती. याबाबत संपूर्ण चौकशी होऊन अखेरीस तीन महिन्यांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीनं खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना पुढील सहा वर्षांसाठी खेड नगरपालिकेच्या सदस्यत्व घेता येणार नसल्याची नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: MNS

    पुढील बातम्या