मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी! संजय राऊतांवर गुन्हा दाखल, 'ते' प्रकरण भोवलं; अडचणी वाढणार?

मोठी बातमी! संजय राऊतांवर गुन्हा दाखल, 'ते' प्रकरण भोवलं; अडचणी वाढणार?

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सोलापूर, 20 मार्च, प्रितम पंडीत : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

बार्शीमध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेतील पीडितेचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला होता. पीडिता ही अल्पवयीन होती, आणि या फोटोद्वारे तिची ओळख पटत असल्यानं संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संजय राऊत यांच्यावर कोणत्या कलमातर्गंत गुन्हा दाखल झाला आहे यांची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. संजय राऊत यांच्याविरोधात पोक्सो 23,  जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलं होतं? 

संजय राऊत यांनी या मुलीचा फोटो ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. पाच मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत' असं राऊत यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Sanjay raut, Shiv sena, Solapur