सांगली, 15 सप्टेंबर : पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती. (Sangli Sadhu Beaten Case) चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची दखल पोलीसांनी घेतली असून याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आता पर्यंत 8जणांना ताब्यात घेऊन 7 लोकांना अटक करण्यात आली आहे.
मारहाण झालेले चार ही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते.
हे ही वाचा : पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना
दरम्यान ते लवंगा (ता.जत) येथे चार चाकी गाडीतून आले यावेळी पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता एका विद्यार्थ्याला विचारला यातून गावात पोरे चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली. आणि त्यात चारही साधूना जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले. सुरुवातीस शिव्याची लखोली वाहली.
यावेळी साधुनी आम्ही वारकरी संप्रदायातील आहोत. आम्हाला पंढरपूरला जाऊ द्या अशी विनवणी केली. परंतु जमावाला दया आली नाही उलट गाडीतून साधूंना रस्त्यावर ओढले, मारहाण केली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतरही जमावाने आणखी कहर केला. अन् जणू काही आरोपी आहेत याच अविर्भावात गावातील मलकारसिद्ध या मंदिरासमोर पकडून ठेवण्यात आले.
पोलीस महासंचालकानी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक सह मोठी टीम बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी होती. यातील संशयित आरोपी म्हणून नऊ जणांना ताब्यात घेतले. दया क्षमा शांती या मार्गाची शिकवण शिकवणाऱ्या साधू वरच दया कोणीही दाखवली नाही. यामुळे सर्व क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे भोवले, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर निलंबित
महाराष्ट्राला खाली मान घालावायला लावणारी घटना
लवंगा (ता.जत )येथील ही घटना वारकरी महिमा जपणाऱ्या महाराष्ट्राला खाली मान घालावायला लावणारी आहे. यापूर्वी अशीच घटना पालघर येथे घडली होती. गैरसमजुकीतून साधूचा ठेचून बळी घेतला होता .या मारहाणीनंतर साधूंचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अजूनही विस्मरणात गेलेला नसताना पालघर प्रकरणाशी साधर्म्य असलेली घटना घडली आहे.या घटनेत 22 ते 25 जणांच्या जमावांना एकालाही दया मानवतावादी शिकवण्याचे विस्मरण झाले हे मात्र खरं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news