बीड, 04 ऑगस्ट - भाजपच्या (bjp) फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ (chitra wagha) आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. मात्र, ठाकरे सरकारवर आरोप करणे चित्रा वाघ यांना अडचणीत आणले आहे. चित्रा वाघ यांच्या विरोधात बीड (beed) जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षांनी एका मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणात गुन्हा दाखल असताना पोलिसांनी अटककेली नाही उलट बलात्काराच्या केसेस मध्ये बी समरीची कारवाई करण्याची घाई केली.
महाविकास आघाडीचे सरकार बलात्कार्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी बदनामी केली म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर औरंगाबादेत एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावरून भाजपने त्यांच्या विरोधात रान उठवले होते. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार व गृह खाते राष्ट्रवादी कडेच असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी पर दबाव आणला जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता भाजपा नेत्या चित्रा वाघ मागच्या आठवड्यात बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता या शिरूर कासार येथे या प्रकारना संदर्भात सरकार वर आरोप केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.