नको तिथे नादखुळा, कोल्हापूर पोलिसांनी घडवली तरुणांना चांगलीच अद्दल!

नको तिथे नादखुळा, कोल्हापूर पोलिसांनी घडवली तरुणांना चांगलीच अद्दल!

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील एका कोविड केअर सेंटरमध्ये चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली होती.

  • Share this:

कोल्हापूर, 28 जुलै : कोल्हापूरकर म्हटले की, नुसता नादखुळा कारभार असतो. पण, असा नादखुळापणा करणे, तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोनाची लागण झाली म्हणून कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असता तरुणांनी फुटबॉलचा सामनाच रंगवला होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील एका कोविड केअर सेंटरमध्ये चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली होती. ज्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फुटबॉल खेळत होते. त्यांच्या या फुटबॉल मॅचचा व्हिडिओ  संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला होता.

पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ इथल्या एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता.  या सेंटरमधील पोर्ले आणि कोतोली गावतील कोरोनाबाधित तरुण फुटबॉल मॅच खेळत होते.

फुटबॉल मॅचचा व्हिडिओ व्हायरल होताच कोडोली पोलिसांनी फुटबॉल खेळणाऱ्या तरुणच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पन्हाळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 180 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील आता 112 ऍक्टिव्ह रुग्णांना वाघबिळ येथील एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 112 रुग्णांमध्ये वृद्धांसह तरुण वयातील मुलांचा समावेश आहे. येथील बहुतांश रुग्णांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाही.

Published by: sachin Salve
First published: July 28, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या