Home /News /maharashtra /

बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल

बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीड, 27 जानेवारी :  नुकत्याच झालेल्या  केज नगरपंचायत निवडणुकीचा (kej Nagar Panchayat Election) एकीकडे जल्लोष सुरू आहे. तर दुसरीकडे केजमध्ये राष्ट्रवादीचा (ncp) नवनिर्वाचित नगरसेवक चंदन तस्कर निघाला आहे. चंदन तस्करी (sandalwood smuggling) प्रकरणात केज नगरपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयाचा उत्सव एकीकडे साजरा करणारे नगरसेवक पाहायला मिळत आहेत मात्र बीडच्या केज नगरपंचायतमधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात चंदन तस्करी प्रकरणात आंबेजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करीप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव असे नगरसेवकाचे नाव आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, पुढील प्लानिंग कसं असणार?) आंबेजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून बाळासाहेब दत्तात्रय जाधव त्याच्या साथीदारांसह वाघाळा शिवारात आंबासाखर कारखाना जवळील देवराव कुंडकर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड मध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करून झाड व झाडाचे खोड तपासून गाभा काढत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली. (बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल) यावरून प्रत्यक्ष कारवाई केली असता 27 किलो चंदनाचा गाभा पकडला  त्याचे किंमत 67500 असून या प्रकरणात तिघा देवराव भानुदास कुंडकर, बाळासाहेब दत्तात्रेय जाधव, सतीश या तीन आरोपी विरोधात कलम 379,34,भांदवी सह 26 एफ,41, 42 भारतीय वन अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Beed news, बातम्या, बीड

पुढील बातम्या