गोविंद वाकडे, चाकण, 11 मे : गर्भवती महिला सपना पवळे आणि त्यांच्या अर्भकाचा उपराचादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने या दोघांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आता रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणमधील नामांकीत आरगडे रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आई आणि मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रुग्णालयाचे डॉ.घाटकर आणि डॉ. सुपेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित डॉक्टर फरार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता चाकण पोलिसांचं पथक आरोपी डॉक्टरांच्या शोधात रवाना झालं आहे.
दरम्यान, रुग्णालयातील गलथान कारभारामुळे आणि डॉक्टरांच्या निष्काळीपणामुळे रुग्णांना जीव गमावावा लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे असे प्रकार नेमका थांबणार तरी कधी, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
SPECIAL REPORT: 'पर वो अकेला आता है', तडीपार गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये काढला TIKTOK