Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत, 25 ते 30 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत, 25 ते 30 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अहमदनगर, 14 जून : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधीच या आदेशाचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. कोणतेही नियम न पाळत वाढदिवसाला गर्दी करणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात नियमांचे पालन केले गेले नाही. विनामास्क एकत्र येऊन कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचारी सचिन गोरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे. शुक्रवारी आमदार संग्राम जगताप यांच्यासह वाढदिवसानिमित्त अभिजित खोसे, बाबा गाडळकर, संतोष ढाकणे, माऊली जाधव यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आयुर्वेद कॉलेज परिसरातील आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोर जमले होते. हेही वाचा - मुंबईची लाईफलाईन पुन्हा धावणार? लोकल सुरू करण्याबात मोठा निर्णय होणार आमदार संग्राम जगताप यांच्यासह या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. गोरे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 188 व 269 अन्वये जगताप यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे याबाबतचा अधिक तपास करत आहेत. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Lockdown, Sangram jagtap

    पुढील बातम्या