सहकारमंत्री सुभाष देशमुखांना धक्का, फसवणूक केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना धक्का, फसवणूक केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

अनुदान मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे दाखल करून सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 28 नोव्हेंबर : दूध भुकटी अनुदान घोटाळा प्रकरणात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना धक्का बसला आहे. लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑपरेटीव्हचे रोहन देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन देशमुख हा सुभाष देशमुख यांचा मुलगा आहे. अनुदान मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे दाखल करून सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. 25 कोटींच्या अनुदानापैकी पाच कोटींचा पहिला हफ्ता देण्यात आला होता.

लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑपरेटीव्हचे रोहन देशमुख यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचावर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  कलम ४२०, ४६५, ४६८ आदी कलमांतर्गत शासनाची फसवणूक करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे दाखल करणे या प्रकरणी  बाझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला आहे.

राज्याचे अवर सचिव राजेश गोविल यांनी दुग्ध विकास आयुक्तांना संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज सदर बाझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आता लोकमंगल समूह काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

============================

First published: November 28, 2018, 11:21 PM IST

ताज्या बातम्या