गरीबांसाठी आलेल्या जीवनावश्यक वस्तूवर नगराध्यक्षासह नगरसेवकांचा डल्ला, गुन्हा दाखल

गरीबांसाठी आलेल्या जीवनावश्यक वस्तूवर नगराध्यक्षासह नगरसेवकांचा डल्ला, गुन्हा दाखल

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट आहे. यामध्ये सर्वात जास्त फटका सर्व सामान्यांना बसला आहे.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल, (प्रतिनिधी)

हिंगोली, 7 ऑगस्ट: सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट आहे. यामध्ये सर्वात जास्त फटका सर्व सामान्यांना बसला आहे. रोजगार नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गरजू, निराधार नागरिक अत्यावश्यक वस्तू न मिळाल्याने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत या गरीबांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, मंदिर संस्थान पुढे येत आहे. मात्र, यामध्ये सुद्धा काही जण आपली पोळी भाजत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा...सुशांत सिंहची हत्या झाल्याचं म्हणता मग पुरावे का देत नाहीत, रोहित पवारांचा भाजपला सवाल

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर संस्थानने कोरोना काळात दैनंदिन अन्नाची गरज भागवण्यासाठी गरीब, कष्टकरी, गरजूंना वाटण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या 500 किट्स कळमनुरी नगर पालिकेत पाठवल्या होत्या. त्या किट्सचे व्यवस्थित नियोजन करून वाटपाबाबत निकष ठरवून देण्यात आले नाही. मात्र त्या किट्स 23 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी कळमनुरी नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी परस्पर लांबवल्याचा आरोप होत आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची कळमनुरी शहर विकास मंचचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. याप्रकरणी नंदकिशोर तोष्णीवाल यांनी हे प्रकरण हाय कोर्टात दाखल केलं होते. याप्रकरणी सर्वप्रथम 'न्यूज 18 लोकमत'नं वृत्त प्रसारित केलं होतं.

आता या प्रकरणी नगर पालिका मुख्याधिकरी उमेश कोठीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगरसेवक राजू प्रकाश संगेकरयांच्यासह एकूण 12 नगरसेवक विरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...नाकारला डिस्चार्ज, नगरसेवकानं चक्क पीपीई किट घालून कोरोना रुग्णाला उचलून नेलं

एकीकडे नागरिक, सामाजिक संस्था, मंदिर संस्थान उदात्त भावनेने गरजू ,गरिबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे. मात्र, कोरोनाचा फायदा अशा प्रकारे घेणे हे दुर्दैवी आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात गरीबांसाठी आलेल्या वस्तू पळवणाऱ्या बाबत पहिला गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या