Home /News /maharashtra /

सुतार आणि वायरमनने केला कहर, बंदुका बनवून विकल्या गुन्हेगारांना!

सुतार आणि वायरमनने केला कहर, बंदुका बनवून विकल्या गुन्हेगारांना!

आतापर्यंत नवी मुंबईत बनावट पिस्तुल मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्यांना अटक केली होती.

नवी मुंबई, 21 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमध्ये गावठी कट्टे तयार करणे आणि विक्रीच्या अनेक घटना समोर आल्या आहे. पण रायगडमधील कर्जतमध्ये सुतारकाम आणि वायरमन असलेल्या दोघांना बंदुका तयार करून विकत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांनीही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत नवी मुंबईत बनावट पिस्तुल मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. आता मात्र नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बंदुका बनवणाऱ्या टोळीला अटक केली आहे. रायगडमधील कर्जत तालुक्यातील खांडपे गावात या बंदुका बनवल्या जात होत्या. व्यवसायाने सुतारकाम करणारा परशुराम पिरकड आणि वायरमन दत्ताराम पंडित या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून 10 बंदुका, 8 अर्धवट बंदुका आणि काडतुसे जमा करण्यात आली. या टोळीने यापूर्वी अनेकांना बंदुका बनवून विकल्यात. यासर्वांची चौकशी पोलीस करत आहेत. या चौकशीत अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शकता पोलीस वर्तवत आहेत. olx वर बाईक विकत घेणे तरुणाला पडेल महागात! दरम्यान, मोबाईलच्या एका क्लिकवर कुठेही बसून ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय आज अनेकजण निवडताना दिसतात. रोज कोट्यावधींचे व्यवहार ॲानलाईन शॉपिंगद्वारे केले जातात. मात्र, मुंबईत एका मुंबईकराला हाच ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय चांगलाच महागात पडलाय. जहांगीर युनूस शेख या पीडित व्यक्तीने olx या संकेतस्थळावर बजाज एव्हेंजर मोटार सायकल घेण्यासाठी जाहिरात देऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक सुद्धा दिला होता. काही दिवसांनी आपल्याकडील बजाज मोटारसायकल विकण्यासाठी आपण इच्छुक असल्याचा फोन जहांगीरला आला होता. गाडी पाहून व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोकरी आगार, म्हाडा चाळी जवळ जहांगीर शेख यास गाडी विकणाऱ्याने बोलावले पण गाडी विकणारे गाडी विकायला नाही तर जहांगिरला लुटायला आले होते. गाडी दाखवण्याच्या बहाणे ४ आरोपींनी कोकरी आगार येथील निर्जन स्थळी जहांगीरला नेऊन जबर मारहाण करुन जहांगीरला कळण्याआधीच त्याच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची १७ ग्राम वजनाची सोन्याची चेन घेऊन आरोपी फरार झाले. घडलेल्या प्रकाराची जहांगीरने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रारार दाखल केली. पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली आणि आरोपी तामिळनाडूला फरार झाल्याचं कळताच पोलिसांच्या विशेष पथकाने तामिळनाडू इथं जाऊन सुरेश पद्मनाभन इसिकी तेवर (वय १९ ) आणि फुलपंडी मरुगण (वय १९ ) या दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी आणखी 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र, ॲानलाईन शॉपिंग करताना विशेष करुन OLX सारख्या संकेतस्थळावर कोणतीही वस्तू विकत घेताना किंवा विकताना खबरदारी घ्यावी कारण जहांगीरचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला. नाही तर त्याच्या जीवावर ही ॲानलाईन शॉपिंग बेतली असती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या