मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : करमाळ्यात मालगाडीचे इंजिन रूळावरून घसरले, मोठी दुर्घटना टळली

BREAKING : करमाळ्यात मालगाडीचे इंजिन रूळावरून घसरले, मोठी दुर्घटना टळली

रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली

रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली

रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karmala, India

करमाळा, 04 सप्टेंबर : सोलापूर (solapur) जिल्ह्यात रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. करमाळा मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर मालगाडी घसरली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर केम हद्दीत लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले (Cargo train engine derails in Karmala) आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोलापूरकडून पुणेच्या दिशेने ही मालगाडी जात होती. करमाळ्याजवळ पोहोचली असता अचानक मालगाडीच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. लुप लाईनवर हा प्रकार घडला.

त्यामुळे मालगाडीचे दोन्ही इंजिन हे रुळावरून खाली घसरले. इंजिन रुळावरून घसरल्यानंतर मोठा आवाज झाला. इंजिनला लागून असलेले तीन डब्बेही रुळावरून खाली घसरले. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट सुरक्षित आहे.

(आईस्क्रिमचा हट्ट जीवावर, नाशिकमध्ये चार वर्षाच्या मुलीचा शॉक लागल्याने मृत्यू)

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मालगाडी मार्गावरून येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. घसरलेले मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सुरू आहे.

First published: