... आणि तो कार सोबत वाहून गेला, पाहा महाराष्ट्रातला आजचा सगळ्यात धक्कादायक VIDEO

... आणि तो कार सोबत वाहून गेला, पाहा महाराष्ट्रातला आजचा सगळ्यात धक्कादायक VIDEO

पुलावर जास्त पाणी आहे कार घेऊन जाऊ नको असे अनेकांनी सांगितल्यानंतरही वाहन चालकाने त्यांचे ऐकले नाही.

  • Share this:

नाशिक, 17 सप्टेंबर : जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दोन दिवस जोरदार बॅटिंग केली आहे. परतीच्या पावसाने मनमाड,येवला,चांदवड भागात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या नद्या दुथडी भरून वाहात आहे. तर दुसरीकडे नांदगाव इथे रस्त्यावर मोठ्या प्राणात पाणी साठल्यानं पूरस्थिती निर्माण झाली.

नांदगाव इथे हिसवळ खुर्दच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतानाही या पुलावरून वाहतूक सुरू होती. याचदरम्यान एक कार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा धडकी भरवणारा VIDEO बिहार किंवा राजस्थानमधल्या पावसाची नाही तर राज्यातील नाशिक जिल्ह्यातला आहे.

हे वाचा-एका क्षणात पत्त्यासारखी कोसळली शाळा, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

नांदगाव इथे बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिसवळ खुर्दच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पूलावर पूरस्थिती निर्माण झाली असतानाही त्यावरून धीम्या गतीनं वाहतूक सुरू होती. ही वाहतूक सुरू असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यासोबत कार वाहून गेली.

पुलावर जास्त पाणी आहे कार घेऊन जाऊ नको असे अनेकांनी सांगितल्यानंतरही वाहन चालकाने त्यांचे ऐकले नाही आणि कार पुराच्या पाण्यातून नेण्याचे धाडस केले ते त्याच्या अंगी आले. पुरात वाहून गेलेली कार अद्यापही मिळाली नाही. या कारमध्ये किती प्रवासी होते आणि या कारचं काय झालं याची अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही. सध्या या कारचा तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या