Home /News /maharashtra /

पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; एक बचावला तर दोघे बेपत्ता, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; एक बचावला तर दोघे बेपत्ता, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Live video of car washed away in flood nanded: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत.

नांदेड, 7 सप्टेंबर : पुराच्या पाण्यातून कार नेण्याचा प्रयत्न अंगाशी आला आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) मुखेडमध्ये एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली (Car washed away in flood). कार पाण्यात वाहून जातानाची थरारक घटना नागरिकांनी मोबाइल कॅमे-यात कैद केली आहे. मुखेड शहरात मुखेड उस्माननगर रोडवर फुले नगर शेजारून मोती नाला जातो. मुसळधार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आलाय. या पुरातूनच एका चालकाने आपली कार नेण्याचा प्रयत्न केला पण कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. कार वाहून जात असताना त्यातून एक जण बाहेर पडला. जवळ असलेल्या झाडावर तो लटकला. बऱ्याच वेळाने या व्यक्तीला स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू केले. त्या गाडीतून आणखी दोघेजण बाहेर पडल्याची माहिती आहे. पण त्यांचा नेमका शोध अजून लागला नाही. ही सर्व थरारक घटना मुखेडमधील काही नागरिकांनी आपल्या घराच्या छतावरून मोबाइलमध्ये टिपली. या कारमध्ये होते आमदार तुषार राठोड यांचा पुतण्या संदीप राठोड आणि चुलत भाऊ भगवान राठोड असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसात बैलजोडी गेली वाहून, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू आहेत. सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे, नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्या समोर आलंय. काल सेलू तालुक्यातील कुपटा या गावात बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Nanded, Rain

पुढील बातम्या