भरधाव वेगात वाहनाने मारला कट, ताबा सुटून कार थेट पडली नदीत, पाहा VIDEO

भरधाव वेगात वाहनाने मारला कट, ताबा सुटून कार थेट पडली नदीत, पाहा VIDEO

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला एका अज्ञात वाहनाने कट मारला. त्यामुळे कार थेट पुलावरून खाली नदीत पडली आहे.

  • Share this:

नाशिक, 21 जून: नाशिकच्या लासलगाव-निफाड मार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला एका अज्ञात वाहनाने कट मारला. त्यामुळे कार थेट पुलावरून खाली नदीत पडली आहे. हा अपघात पाहताच स्थानिकांनी वेळीच धाव घेऊन बुडत्या कारमधून चालकाला बाहेर काढलं. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

कोरोनामुळे रस्त्यावर गर्दी कमी आहे. त्यामुळे कार भरधाव वेगात होती. अशात शेजारी जाणाऱ्या वाहणाने जोरात कट मारल्यामुळे कार नदीत कोसळली. ही घटना लासलगाव-निफाड मार्गावर घडली आहे. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन पाण्यात बुडणाऱ्या कारमधून चालकाला बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला.

बापू होळकर असं या व्यक्तीचे नाव असून ते इथले मका व्यापारी आहेत. कोपरगाव येथून लासलगावला येत असतांना ही घटना घडली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली नाही. स्थानिकांच्या तत्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, होळकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांत या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

संपादन- रेणुका धायबर

First published: June 21, 2020, 9:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या