मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्नाला जाताना कार 200 फूट नदीपात्रात कोसळली, वृद्ध महिला जागीच ठार

लग्नाला जाताना कार 200 फूट नदीपात्रात कोसळली, वृद्ध महिला जागीच ठार

 खेड तालुक्यातील फुरुस पोयनार मार्गावर फुरुस गावात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारूती वॅग्नर कार २०० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात झाला.

खेड तालुक्यातील फुरुस पोयनार मार्गावर फुरुस गावात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारूती वॅग्नर कार २०० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात झाला.

खेड तालुक्यातील फुरुस पोयनार मार्गावर फुरुस गावात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारूती वॅग्नर कार २०० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात झाला.

  • Published by:  sachin Salve

खेड, 03 जानेवारी : लग्नासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला खेडमधील फुरूस गावात भीषण अपघात झाला. कुटुंबातील सदस्यांसह ही कार थेट 200 फूट नदीपात्रात कोसळली. या अपघातात ७० वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मयत यांचा नवरा आणि बहिणीचा समावेश आहे. हा अपघात खेड तालुक्यातील फुरुस-पोयनार मार्गावर फुरुस इथं झाला.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खेड तालुक्यातील फुरुस पोयनार मार्गावर फुरुस गावात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारूती वॅग्नर कार २०० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात झाला. या अपघातात खैरुनिसा फरीद परकार (वय ७०) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली तर गाडीत असणारी मयत खैरुनिसा परकार यांच्या बहीण जैनबी कामालुद्दीन परकार वाय ६० आणि कार चालक फरीद महम्मद अली परकार गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जैनबी परकार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

फरीद परकार आणि त्यांच्या कुटुंबातील २ लोक असे तिघे गावातच फुरुस इथं त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी त्यांच्या मारुती वॅग्नर कारने जात होते. चालक फरीद परकार यांचा अचानक कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यावरून २०० फूट घरंगळत जाऊन नदीपात्रात कोसळली. अपघात झाल्यानंतर गावातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना फुरुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी खैरुनिसा परकार यांना मृत घोषित केलं.  त्यांचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर जखमी जैनबी परकार आणि फरीद परकार यांना दापोली येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली अडकूर, हवालदार प्रकाश मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चालले होते दिव्यांग शिक्षक, एसटी बसच्या धडकेत जागीच ठार

दरम्यान, बुलडाण्यात साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे.  बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बुलडाणावरून खामगाव मार्गावर दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पद्माकर भोसले असं मृत शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

खामगाव तालुक्यातील रोहणा गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बुलडाण्यावरून खामगाव मार्गे अकोलाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने  समोरून येणाऱ्या दिव्यांगाच्या तीन चाकी मोटरसायकलला  धडक दिली. या अपघातात शिक्षक पद्माकर बोचरे हे जागीच ठार झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दिव्यांग शिक्षकाच्या तीनचाकी दुचाकीचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथे हलविले आहे.

शिक्षक बोचरे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव राजा येथून रोहणा या गावासाठी निघाले होते. परंतु, वाटेतच्या त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. बोचरे हे साखर विद्यामंदिराच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

First published: