मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

सांगलीतील (Sangli) विटा याठिकाणी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाहन सुरू करत असताना गाडीने अचानक पेट (car caught fire) घेतल्याने भाजी विक्रेत्याचा जागीच होरपळून मृत्यू (vegetable seller death) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

सांगली, 08 जून: सांगलीतील (Sangli) विटा या ठिकाणी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एक भाजीविक्रेता आपल्या चारचाकी वाहनात भाजीपाला आणि अन्य किराणा सामान भरून विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी गाडी सुरू करत असताना गाडीने अचानक पेट (car caught fire) घेतला. या दुर्दैवी अपघातात 50 वर्षीय भाजी विक्रेत्याचा जागीच होरपळून मृत्यू (vegetable seller death) झाला आहे. संबंधित घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शाहुनगर याठिकाणी घडली आहे.

संबंधित दुर्दैवी अपघातात मृत्यू पावलेल्या 50 वर्षीय भाजीविक्रेत्याचं नाव रघुनाथ रामचंद्र ताटे असून ते विट्यातील शाहुनगर येथील रहिवासी आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मृत ताटे नेहमीप्रमाणे भाजीपाला आणि किराणा सामान आपल्या वाहनात भरून विक्रीसाठी घेऊन चालले होते. दरम्यान वाहन सुरू करत असतानाच वाहनाने अचानक पेट घेतला. क्षणार्धात वाहनाचा भडका झाल्याने ताटे यांना काय कराव हेही सुचलं नाही. तसेच स्टेरिंगजवळ असल्याने त्यांना पटकण बाहेरही पडता आलं नाही.

हे ही वाचा-प्रेयसीची छेड काढल्यानं दिली आयुष्यभराची शिक्षा; दगडाने ठेचून केला खेळ खल्लास

त्यामुळे काही क्षणातचं ताटे यांचा वाहनात होरपळून मृत्यू झाला. मोटारीतील वायरिंगने अचानक पेट घेतल्याने हा भडका झाल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं जात आहे आहे. मोटारीने पेट घेतल्यानंतर आसपासच्या स्थानिक लोकांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अचानक गाडीने पेट घेऊन होरपळून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Accident, Fire, Sangli