पंढरपूर, 31 ऑक्टोबर : कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पायी दिंडीत कार घुसली. यामुळे सहा वारकरी जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. तर हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मृतांची नावे पुढील प्रमाणे -
शारदा आनंदा घोडके 61 वर्ष
सुशीला पवार
रंजना बळवंत जाधव
गौरव पवार 14 वर्ष
सर्जेराव श्रीपती जाधव
सुनिता सुभाष काटे
शांताबाई शिवाजी जाधव
या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट -
सांगोला-मिरज मार्गावर एका दुर्दैवी अपघातात कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणार्या काही वारकर्यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. https://t.co/WJQzofUgp8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
सांगोला-मिरज मार्गावर एका दुर्दैवी अपघातात कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणार्या काही वारकर्यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.