असा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल! जोरदार धडकेनंतर तरूण थेट कारच्या टपावर, पाहा LIVE VIDEO

असा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल! जोरदार धडकेनंतर तरूण थेट कारच्या टपावर, पाहा LIVE VIDEO

कारला धडक दिल्यानंतर तरुण थेट टपावर गेल्याने त्याचा जीव वाचला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • Share this:

वसई, 27 ऑक्टोबर : वसई पश्चिम माणिकपूर येथील पेट्रोलपंपाजवळ कार आणि भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत दुचाकीस्वार तरुण थोडक्यात वाचला आहे. कारला धडक दिल्यानंतर तरुण थेट टपावर गेल्याने त्याचा जीव वाचला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

माणिकपूर इथं काल रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. पेट्रोल पंपावर जाण्यासाठी इनोव्हा कार रस्ता ओलांडत होती. इतक्यात भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने कारला जोरदार धडक दिली. दुचाकीचा वेग इतका होता की स्वार असलेला चालक कारला धडकून थेट तिच्या टपावर पोहोचला व त्यानंतर कोणतीही इजा न होता तो पुन्हा उभा राहिला.

या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला असून काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघात जीवितहानी झाली नसली तरीही वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

दरम्यान, अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुन्हा रस्त्यावर गाड्या धावू लागल्या आहेत. यासोबतच अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातील बहुतांश अपघातांचं कारण वेगावर नियंत्रण नसणे हेच आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 27, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या