सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 24 फेब्रुवारी : रविवारी सकाळच्या दरम्यान बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बीडच्या सोलापूर-धुळे महामार्गावर पाली इथे हा अपघात झाला आहे. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावर पाली येथून जात असताना ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर टक्कर झाली आणि त्यातून हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
अल्टो कारमधील सर्वजण हे औरंगाबादहून उस्मानाबादला जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे. तर पोलीस आता या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातासंदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलीस आता प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तर परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत.
Live Murder Video: 30 वेळा मित्राला भोसकलं, नंतर अंगावर गाडी घालून निघून गेला...!