कारची ट्रकला भीषण धडक, अपघातात 4 जण जागीच ठार

कारची ट्रकला भीषण धडक, अपघातात 4 जण जागीच ठार

नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ ट्रक (MP 09 HH 8378) आणि कारचा (MH 04 BY 4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी इथला एकजण असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 26 सप्टेंबर : परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. याच मुसळधार पावसामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. अहमदनगरच्या दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली  आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ ट्रक (MP 09 HH 8378) आणि कारचा (MH 04 BY 4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी इथला एकजण असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - परतीचा पाऊस आणखी 2 दिवस तुफान बरसणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा!

अपघातातील फोटो पाहिला असता मागून येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कारने जोरात ट्रकला धडक दिल्यामुळे यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील 4 ही जण श्रीगोंद्यावरून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस आता या अपघाताची चौकशी करत आहेत.

इतर बातम्या - संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान, पुण्यात 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, पोलिसांनी अपघात स्थळावरून 4 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर रस्त्यातील अपघाती वाहनंदेखील रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. पाऊस असल्यामुळे रस्ते ओले आणि निसरडे झाले आहेत. त्यात मुसळधार पावसामुळे समोरचं दिसत नाही. अशावेळी गाडी सावकाश चालवण्याच्या अनेक सूचना देण्यात येतात. पण त्याचं उल्लंघन केल्यामुळे अशा अपघातांना समोरं जावं लागतं.

मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य, पाहा LIVE VIDEO

First published: September 26, 2019, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading