Home /News /maharashtra /

अंबरनाथमधील नवीन MIDC मध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 4 ठार

अंबरनाथमधील नवीन MIDC मध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 4 ठार

अंबरनाथमधील (ambarnath) नवीन एमआयडीसी भागात भीषण अपघात झाला आहे.

अंबरनाथमधील (ambarnath) नवीन एमआयडीसी भागात भीषण अपघात झाला आहे.

अंबरनाथमधील (ambarnath) नवीन एमआयडीसी भागात भीषण अपघात झाला आहे.

अंबरनाथ, 12 सप्टेंबर : अंबरनाथमधील (ambarnath) नवीन एमआयडीसी भागात भीषण अपघात झाला आहे. रिक्षा (auto rickshaw ) आणि कारची (car) भीषण धडक झाली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू (4 dead) झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  नवीन एमआयडीसी (MIDC)  भागात हा भीषण अपघात झाला आहे. महिंद्रा झायलो कार आणि रिक्षाची जोरात धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षाचा चुराडा झाला आहे. तर कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षातील प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरू आहे. (सविस्तर बातमी लवकरच)
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या