कोल्हापूर, 23 ऑक्टोबर : कोल्हापुराजवळ गगडबावडा इथे कळंबे गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने एसटी बसला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला आहे. कणकवलीहून लातूरच्या दिशेनं निघालेल्या बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये इनोव्हा कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
इनोव्हा कारमधून तीन जण गावी जात असताना भरधाव कारनं समोरून येणाऱ्या बसला धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोल्हापुरात भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. pic.twitter.com/ha7c8jACrw
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) October 23, 2020
हे वाचा-काही सेकंदावर घर असतानाच झाला अपघात, बसच्या टायरखाली डोकं चिरडून तरुणीचा मृत्यू
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कारच्या पुढच्या बोनेचा चुराडा झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. हा अपघात कळंबे गावाजवळ झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गुरुवारी संध्याकाळी जालना-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळ एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. भरधाव पिकअप मिनी जीप चक्क दोन चाकांवर आडवी जात उटली झाली आणि अपघात झाला. या अपघातात थोडक्यात दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur