कार आणि एसटीचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

कार आणि एसटीचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

एसटी आणि कारची भीषण धडक झाली. ज्यात एकाच गावातील 5 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 13 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एक अपघात झाला. गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. एसटी आणि कारची भीषण धडक झाली. ज्यात एकाच गावातील 5 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

कोल्हापूरमधला शनिवारचा हा दुसरा अपघात आहे. सकाळच्या सुमारास कार धडकून भीषण अपघाता झाला. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गडहिंग्लज तालुक्याला याच परिसरात सुमो कार आणि बसची धडक बसली आहे. त्यामुळे आज गडहिंग्लजमध्ये घातवार ठरला असं म्हणायला हरकत नाही.

चंदगडहून नुलला येताना सुमो कारला अपघात झाला. यामध्ये मृत झालेले पाचही जण कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावचे आहेत. अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

भर रस्त्यात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाली आहे. तर घटनेची माहीत मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.

तर पोलिसांनी घटनास्थळावरून 5 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आईच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला

नियती क्रुर असते असं म्हणतात. पण, या नियतीच्या क्रुरपणाचा प्रत्येय कोल्हापूरकरांना आला. आईचा मृत्यू झाला म्हणून गडहिंग्लज तालुक्यातील गावठाण गावातील नांदवडेकर कुटुंब आपल्या मुळ गावी चाललं होतं. कामानिमित्त नांदवडेकर कुटुंब पुणे येथे वास्तव्याला होतं.

कारनं नांदवडेकर कुटुंब आईच्या अंत्यसंस्कारासाठी चाललं होतं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.काळ देखील निष्ठूर झाला होता. यावेळी कारला अपघात झाला. कार झाडावर आदळली. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. तर, 5 जण जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आई, मुलाचा मृत्यू

या अपघातात काळानं नांदवडेकर कुटुंबावर घाला घातला होता. कारण, यामध्ये वासंती नांदवडेकर आणि मुलगा सोहम नांदवडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं साऱ्या जिल्ह्यातत हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय, नियती तु इतकी क्रुर का झालीस? असा हतबल सवाल देखील केला जात आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...

First published: April 13, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या