पिंपरी चिंचवड, 22 डिसेंबर : भरधाव वेगात कार चालविणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या दुकानात कार घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात ही घटना घडली असून यामध्ये कारचालक जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त कारमध्ये चार मुलं होती. अपघातानंतर एअर बॅग ओपन झाल्याने सगळे सुखरुप बचावले. मात्र नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसलेली कार दोन वेळा पलटल्याने कारचं मोठं नुकसान झालं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांकडून रॅश ड्रायव्हिंग संदर्भातील गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण आणि मुलांची नावे याबाबत माहिती दिली जाईल, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हायवेवर वेगावर नियंत्रण न राहिल्याने होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अपघातग्रस्तांमध्ये विशेषत: तरुणांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वाहन चालवता वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.