'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद

'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात चक्क पोलीस मटका चालविणाऱ्यांना हफ्ता घेऊन अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

  • Share this:

29 जुलै : उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात चक्क पोलीस मटका चालविणाऱ्यांना हफ्ता घेऊन अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  माझे 10 हजार रुपये मला दे, असं हे पोलीस महाशय सांगतात. त्यांचं नाव आर ए मोमीन. आयबीएन लोकमतने हा व्हिडिओ दाखवताच या हप्तेखोर पोलीस उपनिरक्षकावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

मुरूम येथील सहायक पोलीस उप निरीक्षक आर ए मोमीन हे मटका बुकी वाला उमरगा येथील बशीर यांच्या नावाचा उल्लेख करून माझे मला दहा हजार रु दे अशी मागणी केली.  हप्ता देणाऱ्या मटका चालवणाऱ्या पोलिसांना पैसे देणाऱ्या व्यक्तीनेच पोलीस उपनिरीक्षक मोमीन यांचे पैसे घेतानाचे आणि ते कसे

उघडपणे पैसे मागतात याचे व्हिडिओ शूटिंग केले आहे. हा व्हिडिओ सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल झाला.  हाच व्हिडिओ आता ibn लोकमतच्या हाती लागला आहे.

मोमीन यांनी सात वर्ष मुरूम पोलीस ठाणे येथे अलुर बिट अंमलदार म्हणून काम पाहिले आहे. त्याच मोमीनची उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली परंतु मुरूम ठाणे येथेच रुजू झाले आणि आणि दोन वर्ष झाले उपनिरीक्षक म्हणून काम पाहतात आणि मोमीनयांनी त्यांच्या नावे आणि नातेवाईकच्या नावे भरपूर प्रमाणात माया गोळा केली असल्याची चर्चा सध्या मुरूम परिसरात सुरू आहे . या हप्तेखोर पोलीस उपनिरक्षकावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

First published: July 29, 2017, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading