नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहे. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्राचे पुढचे राज्यपाल कोण असतील याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल पदासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच राज्यपालपदाबाबत मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले अमरिंदर सिंग?
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चर्चेवर अमरिंदर सिंग यांनी मैन सोडले आहे. आपल्याला याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी नकार देखील दिलेला नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जीथे सांगतील तिथे मी जाईल असं ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : MLC Election: अमरावतीमध्येही भाजपला धक्का; मविआचे धिरज लिंगाडे विजयी
राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विरोधकांकडून राज्यपालांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.