नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ

नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ

नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा सुरू असताना शिवा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

  • Share this:

नांदेड,09 आॅक्टोबर : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा सुरू असताना शिवा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देणारे ते सर्व जण अशोक चव्हाण यांनी पाठवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोणत्या मागणीसाठी शिवा संघटनेने मुख्यमंत्र्याच्या सभेत गोंधळ घातला हे समजू शकले नाही. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत हदगाव आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकीत नरसी येथे झालेल्या मुख्यमंत्र्याच्या सभेत देखील अशीच घोषणाबाजी झाली होती.

तसंच शिवसेना-भाजपमध्ये लढाई नाही. त्यामुळे त्यांच्या विषयावर बोलणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

११ ऑक्टोबरला नांदेड महापालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर तोंडसुख घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 02:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading