मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू, गावातील निवडणूक रद्द

मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू, गावातील निवडणूक रद्द

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सायबण्णा बिराजदार असं या उमेदवाराचं नाव आहे.

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सायबण्णा बिराजदार असं या उमेदवाराचं नाव आहे.

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सायबण्णा बिराजदार असं या उमेदवाराचं नाव आहे.

सोलापूर, 15 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election 2021 maharashtra) मतदान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ऐन मतदानाच्या दिवशीत मृत्यू झाला आहे. उमेदवारचा मृत्यू झाल्यामुळे गावातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा नैसर्गिक मृत्यू  झाला आहे. सायबण्णा बिराजदार असं या उमेदवाराचं नाव आहे. आज मतदानाच्या दिवशी पहाटे 4 च्या सुमारास नैसर्गिक कारणांनी बिराजदार यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

बिराजदार उमेदवार असलेल्या संबंधित वार्डाची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.  ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बिराजदार यांच्या मृत्यूमुळे वॉर्डातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय निवडणूक कर्मचाऱ्याने घेतला आहे.

दरम्यान, राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. ठिकठिकाणी शांतेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव, चांदवडमध्ये मशीन बिघाड झाल्याचे समोर आले. तर दौंडमध्ये मतदान केंद्राबाहेरच हाणामारीची घटना घडली आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागातील मालेगाव,येवला,नांदगाव, चांदवड,बागलाण आणि देवळा या 6 तालुक्यातील 330 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान  सुरू आहे. मनमाडच्या पानेवाडीला ईव्हीएम मशीनमधून उमेदवाराचे नाव गायब होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. अखेर मशीन दुरुस्त केल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी आणि कऱ्ही,अमोदे, ख़िरडी व ढेकुमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे 2 तास मतदान प्रक्रिया बंद होती. येवला,मालेगाव येथे ही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे समोर आले. सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते.

मात्र, 10 वाजेनंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या दुपारी 12 वाजे प्रयत्न 40 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार न घडता सध्या मतदान शांततेत पार पडत आहे. सर्व मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

First published:

Tags: Gram panchayat, सोलापूर