नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

नितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

  • Share this:

मुंबई 5 जुलै : अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे.नितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

जामीन फेटाळला

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. Research भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की जगणही कठीण होईल

कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बॉलिवूडचे 'हे' दोन स्टार सिनेमे सोडून बिहारमध्ये करत आहेत शेती

नारायण राणे यांनी मागितली माफी

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

First published: July 5, 2019, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading