बालकांचे वर्ष वाया जाणार नाही! सहा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पहिलीत प्रवेश

बालकांचे वर्ष वाया जाणार नाही! सहा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पहिलीत प्रवेश

सहा वर्षे वयाची अट असल्याने जुलैनंतर जन्मलेल्या अनेक बालकांचे वर्ष वाया जात होते

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : आतापर्यंत पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट असल्याने जुलैनंतर जन्मलेल्या अनेक बालकांचे वर्ष वाया जात होते. मात्र आता शिक्षण विभागाने यामध्ये बदल केला असून प्रत्यक्ष सहा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तुमचे पाल्य़ पहिलीच्या वर्षात प्रवेश घेऊ शकणार आहे. 2010 मधील बदलानुसार पूर्व प्राथमिक वर्षाला प्रवेश घेण्यासाठी वय़ाची तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

पहिलीतील प्रवेशासाठी जुलैपर्यंतची अट ग्राह्य धरली जात असल्याने ऑगस्टनंतर जन्मलेल्या बालकांना पहिल्याच्या प्रवेशासाठी पुढील वर्षाच्य़ा जुलैपर्यंतची वाट पाहावी लागत असे. या नियमामुळे पालकांमध्ये नाराजी होती. या नियमामुळे मुलांचे एक वर्ष विनाकारण वाया जात असल्याच्या तक्रारी त्यांच्य़ाकडून केल्या जात होत्या. मात्र शिक्षण विभागाने या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले. तरी या नियमात बदल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आगामी (2020-21) या वर्षात या नियमात अधिक शिथिलता आणून 31 डिसेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याची मुभा देण्याचे शिक्षण विभागाच्या विचारधीन आहे.

First published: January 21, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या