जळगाव, 05 डिसेंबर : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आखाडा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या रिंगणात उतरलेल्या आहे. त्यांच्याविरोधात भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे, सूनबाई रक्षा खडसे या आपल्या सासूबाईंच्या विरोधात प्रचार करत असल्यामुळे निवडणुकीला रंगत आली आहे.
जळगाव जिल्हा निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुक्ताईनगरातून महाविकास आघाडीच्या पॅनलकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या निवडणूक लढवत आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण रिंगणात आहे.
(उदयनराजे भाजपमध्ये नाराज आहे का? शिवेंद्रराजेंचं मोठं विधान आणि दिला सल्ला)
रविवारी एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपने मेळावा आयोजित केला होता. यावेळी गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या खासदार रक्षा खडसे सुद्धा हजर होत्या. त्यांची उपस्थितीत ही चर्चेचा विषय ठरला होता.
दरम्यान, मंदा खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री भाजपचे सर्व आमदार खासदार कामाला लागले आहेत. मात्र, 'शेर तो अकेला होता है.. झुंड मे तो गिधड आते है' असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रति आव्हान दिले आहे.
(कर्नाटकच्या वेशीवर असलेल्या 'त्या' 40 गावांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा, उदय सामंत म्हणाले...)
'जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे पॉवरफुल आहेत की त्यांना पाडण्यासाठी दोन दोन मंत्री भाजपचे सर्व आमदार खासदार कामाला लागले आहेत. मी किती पॉवरफुल आहे की माझ्यामुळे एवढ्या जणांना भिंगरी लागली.असे म्हणत खडसेंनी दूध संघ निवडणुकीत वेदकांकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला.
तसंच, 'जय पराभव हा नंतरचा विषय आहे. तुम्हाला मी एकटाच काफी आहे. माझ्या मागे इडी,सीबीआय लावतात. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं. आता मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहेत. सत्तेचा माज आणि मस्ती सुरू असून मला बघून घेईन म्हणतात. मात्र मी पण आता बघूनच घेईन, असा इशारा ही एकनाथ खडसे यांनी विरोधकांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news