• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापुरातील तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसाठी रक्ताने लिहिलं पत्र

कोल्हापुरातील तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसाठी रक्ताने लिहिलं पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार (Sword) भारतात आणण्यासाठी कोल्हापूरमधून (Kolhapur) एका मोहिमेला सुरुवात झाली आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 15 मार्च : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे आणि आजही तो इतिहास प्रेरणा देणाराच आहे. पण याच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार (Sword) भारतात आणण्यासाठी कोल्हापूरमधून (Kolhapur) एका मोहिमेला सुरुवात झाली आहे. शिवदुर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने ही तलवार परत आणण्यासाठी आता आंदोलन उभं केलं जात आहे. शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये आंदोलनही करण्यात आलं. आजही महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले इतिहासाची साक्ष देतात गड किल्ल्यांचा विकास अजून झाला नसला तरी ऐतिहासिक अवशेष आजही या गडकिल्ल्यांवर पाहायला मिळतात आणि दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये असल्याचे पुरावे आता समोर आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही तलवार परत आणण्यासाठी कोल्हापूरमधून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराजवळ तावडे हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न शिवप्रेमींकडून करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी सगळ्या शिवप्रेमींना ताब्यात घेतलं. त्यानंतर आता शिवदुर्ग संवर्धन मोहिमेचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी स्वतःच्या रक्ताने देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राची दखल घेऊन तरी सरकार दरबारी ही तलवार आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हेही वाचा - पुण्यात वेगवेगळ्या लशींचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ, नागरिकांमध्ये नाराजी दरम्यान, शिवाजी महाराजांची तलवार जोपर्यंत महाराष्ट्रात आणली जात नाही तोपर्यंत इंग्लंड विरुद्धचा क्रिकेट सामना आणि इतर खेळ भारताने खेळू नयेत अशीही मागणीही या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे, हर्षल सुर्वे यांच्यासह प्रदीप हांडे, विजय दरवान, चैतन्य अष्टेकर, देवेंद्र सावंत या शिवप्रेमींनी राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेऊन त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात राज्य आणि केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेणार का, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published: