• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भाऊची हवा! ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' उमेदवारासाठी थेट ऑस्ट्रेलियात निघाली प्रचार रॅली

भाऊची हवा! ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' उमेदवारासाठी थेट ऑस्ट्रेलियात निघाली प्रचार रॅली

डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर होताना पाहायला मिळत आहे.

  • Share this:
मुंबई, 10 जानेवारी : सध्या राज्यात ग्रामपंचायंतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सगळ्याच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.  येत्या 15 तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून गावोगावात या निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर होताना पाहायला मिळत आहे. डांभुर्णी ग्रामपंचायतीचे उमेदवार शुभम गिरीश विसवे यांना विजयी करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियातून प्रचार होत आहे. शुभम गिरीश विसवे हे डांभुर्णी ता. यावल ग्रामपंतायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 चे उमेदवार आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील त्यांच्या मित्रांकडून आवाहन करण्यात आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. शुभम यांच्या मित्रांनी मेलबर्नमध्ये “वॉर्ड क्रमांक 2 मधील जनतेने उच्चशिक्षित उमेदवार शुभम विसवे यांना मतदान करुन भरगोस मतांनी विजयी करा “, असे बॅनर झळकावून प्रचार केला आहे. ही प्रचार रॅली मेलबर्नच्या स्टेट लायब्ररीपासून ते फ्लिंडर्स स्ट्रीटपर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीत शुभम विसवे यांच्या भारतीय मित्रांसोबतच परदेशी मित्रही सहभागी झाले होते. याबाबत बोलताना शुभम यांचे मित्र विश्वतेज सावंत यांनी सांगितले की, "शुभम आणि माझी भेट पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये झाली आणि गेल्या सात वर्षांपासून आम्ही चांगले मित्र आहोत. युवा पिढीचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी शुभमने राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्यांदाच तो  ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे. परंतु  शुभमच्या प्रचारासाठी आम्ही भारतात येऊ शकलो नाही.त्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन ऑस्ट्रेलियात केलं. आम्हाला खात्री आहे की शुभम येणाऱ्या काळात युवा पिढीसाठी आणि गावासाठी चांगलं काम करेल “. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट ऑस्ट्रेलेलियातून होत असलेल्या या प्रचाराने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. येत्या 18 तारखेला या निवडणुकीचे निकाल लागणार असून या निकालाची अनेकांना उत्सुकता आहे.
Published by:Akshay Shitole
First published: