सटाणा, बब्बू शेख, 05 एप्रिल : परिक्षेचे टेन्शन, निकालाचं टेन्शन अशा एक ना अनेक समस्या सध्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या असतात. यातून काही विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल देखील उचलतात. स्पर्धेच्या जगात टिकलं पाहिजे हीच भावना सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. दरम्यान, परिक्षेच्या निकाल काय येईल या टेन्शनमुळे दहावीतील एका मुलाचं हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. नाशिकमधील सटाणा येथील ही दुर्दैवी घटना आहे. शहरातील गिरीश बच्छाव या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असून त्यानं नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. परिक्षेमध्ये पास होणार की नाही? ही चिंता त्याला सतावत होती. त्यातून त्याला हार्ट अटॅक आला असं गिरीशच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या घटनेनं सध्या शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर