विजय देसाई,ता.12 ऑगस्ट : दारूची ऑनलाईन विक्री करणारी टोळी उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त केली आहे. घरपोच दारूसेवा देण्यासाठी या टोळीनं एक कॉल सेंटर सुरू केलं होतं. या कॉल सेंटरवर फोन करून देशी-विदेशी दारूची मागणी केल्यास तत्काळ सेवा घरपोच दिली जात होती. या गोरखधंद्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने तातडीनं कारवाई करत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयातील ५० वाईन शॉप्स सील केले आहेत. तर एकाला अटक करण्यात आलीय. मुंबईतल्या उच्चभ्रुंची वस्ती असलेल्या जुहू इथं हे कॉल सेंटर चालवतं जात होतं. मनिष पारदासानी हा या कॉलसेंटरचा मालक असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होता. मनिष सध्या फरार झालाय.
सूर्याच्या सगळ्यात जवळ जाणारं नासाचं 'सोलर प्रोब' अवकाशात झेपावलं !
प्रभादेवीनंतर आता 'या' स्थानकांचीही बदलणार नावं!
या कॉलसेंटरचे काही विशिष्ट क्रमांक होते. सोशल मीडियावरून त्याची जाहीरात करण्यात आली होती. या कॉल सेंटवर फोन करून तुम्ही मागणी नोंदवली की घरपोच सेवा दिली जात होती. यात फक्त दारूचेच पैसे घेतले जात होते डिलेव्हरी फ्री असल्याने मागणीही वाढत होती.
पुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद
सिडको करणार तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण, असा भरा अर्ज
उत्पादन शुल्क विभागाला याच माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. एका अधिकाऱ्याने त्या विशिष्ट क्रमांकावर फोन करून मागणी नोंदवली. त्यानंतर नेपीयन्स रोडवरच्या मोक्ष वाईन शॉपमधून काही वेळातच राजेंद्र साहू हा तरूण डिलीव्हरी घेऊन आला. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने त्याला अटक करून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती मिळाली.
त्यानंतर या कॉलसेंटरचं बिंग फुटलं. मनिषला पोलीसांनी फरार घोषीत केलं आहे. त्या माहितीच्या आधारे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड इथले 50 दुकानं सील करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: दारू