राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार, या नेत्यांना मिळणार मंत्रिपद?

राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार, या नेत्यांना मिळणार मंत्रिपद?

लोकसभा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहे. त्यामुळे नव्या नावांची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 15 मे : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही मंत्रिपद ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे.

हा मंत्रिमंडळ विस्तार 23 मे रोजी लोकसभेच्या निर्णयावर अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीचा निराल जर भाजपला चांगला लागला तर राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांना मोठी खाती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहे. त्यामुळे नव्या नावांची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनेक मोठे धक्के दिले. त्यामुळे आता या विस्तारात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकांची तयारी  सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काँग्रेस-राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अनेक नेत्यांना मोठी पद दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील लोकसभेची जागा गिरीश बापट यांनी जिंकल्यास त्यांची अन्न आणि पुरवठा तसंच संसदीय कामकाज ही दोन खाती दुस-या व्यक्तीला सोपवावी लागतील. तसंच पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तसंच गेल्या काही दिवसांत अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येतील अशी जोरदार चर्चा आहे. त्यांना सामावून घेण्यासाठीही मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, तसंच जयदत्त क्षीरसागर यांच्या पण नावांचा समावेश आहे. यांना सामावून घेण्यासाठी 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात सुरू आहे.

राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?

दरम्यान, काँग्रेसने नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत त्यांना भाजपने अहमदनगरमधून उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशात होणाऱ्या विस्तारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठं पदं दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे.

जयदत्त क्षिरसागर कोणत्या पक्षात जाणार?

कोणत्या पक्षात जाणार?

जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली असली तरीही आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याचा निर्णय 18 एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात त्यांनी गुढीपाडव्याला उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस

First published: May 15, 2019, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading