'तुझा दाभोलकर होणार', कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी

एकीकडे वाद सुरू असतानाच आव्हाड यांना सोशल मीडियावरून थेट धमकी देण्यात आली आहे.

एकीकडे वाद सुरू असतानाच आव्हाड यांना सोशल मीडियावरून थेट धमकी देण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 8 एप्रिल : तरुणाने केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्य़ा भोवऱ्यात सापडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र एकीकडे हा वाद सुरू असतानाच आव्हाड यांना सोशल मीडियावरून थेट धमकी देण्यात आली आहे. 'तुझा दाभोलकर होणार,' अशी धमकी एका तरुणाने ट्विटरवरुन जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. काल झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यालाच अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड काही लोकांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता अशी उघड धमकी देण्यात आल्यानंतर याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल. जितेंद्र आव्हाड आणि मारहाण प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यााच आरोप करण्यात येत आहे. संपादन- अक्षय शितोळे
First published: