Home /News /maharashtra /

शिवसेना मंत्र्याच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी

शिवसेना मंत्र्याच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे पहिल्यादाच मायभूमीत आगमन झाले.

राजेश भागवत,(प्रतिनिधी) जळगाव,1 जानेवारी: शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे बुधवारी दुपारी जळगाव रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुलाबराव पाटील हे मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने जळगावात पोहोचले. गुलाबराव पाटील हे प्लॉटफॉर्मवर पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. यावेळी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दोन ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही महिला उपचारासाठी साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेली माहिती अशी की, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे पहिल्यादाच मायभूमीत आगमन झाले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता गुलाबराव पाटील याचे जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन पक्षाच्या दोन ज्येष्ठ महिला पदाधिकारी जखमी झाल्या. गुलाबराव पाटील खुद्द गर्दीत अडकले होते. सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी गर्दी बाजुला करत पाटील यांना जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून त्यांच्या मिरवणूक काढली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोठे निर्णय घेतले. पक्षातील प्रस्थापितांना दूर करून नवीन चेहऱ्यांनी पसंती देण्यात आली. शिवसेनेने थेट प्रस्थापितांना डावलले. त्यात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रवींद्र वायकर, दीपक केसरकर यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना संधी देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे विधान परिषदेतील फक्त आमदार अनिल परब यांनाच मंत्रिमंडळासाठी अधिकृत फोनवरून निरोप देण्यात आलाा आहे. तसेच जे दिग्गज आमदार मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते, त्यांना अद्यापही निरोप देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत मोठे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेची भाकरी फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Cabinet minister, Gulabrao patil, Jalgaon news, Khandesh, Maharashtra news, Shiv sena

पुढील बातम्या