मुंबई, 29 ऑक्टोबर: कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना दुसरीकडे मात्र राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पाठोपाठ खासदार सुनील तटकरे आणि आता राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दिलीप वळसे पाटील हे कॅबिनेट बैठकीसाठी आज सकाळी मंत्रालयात आले होते. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते तात्काळ मंत्रालयातून निघून गेले. वळसे पाटील यांनी तुर्तास विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा...मुंबईत लोकल सुरू होणार पण.., रेल्वेचं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर
दिलीप वळसे पाटील यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वळसे पाटील कुटूंबातील सर्व सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. वळसे पाटील यांना आज मुंबईतील खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्याची शक्यता आहे.
खासदार सुनील तटकरेंनाही कोरोना
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खासदार सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता याच हॉस्पिटलमध्ये तटकरे यांनाही दाखल करण्यात आले आहे.
अजित पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा...नवरात्रातल्या गर्दीमुळे राजधानीत Corona ची दुसरी नव्हे तिसरी लाट
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली होती. तसंच, 'राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोडाश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन' असंही अजित म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.