महाराष्ट्रात CAA कायदा लागू होणार नाही, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

महाराष्ट्रात CAA कायदा लागू होणार नाही, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती

  • Share this:

मुंबई, 2 फेब्रुवारी : ‘नागरीकत्व सिद्धं करणं हा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’ त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा प्रोमो हा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे CAA वरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होताना दिसतोय. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा तीसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोत CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं उत्तर दिलंय. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून CAA संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अनेकांची मागणी होती. त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून राष्ट्रवादी व काॅंग्रेसने CAA विरोधात भूमिका घेतली असताना त्यांच्यासोबत सत्ते असणारा शिवसेना हा पक्ष काय भूमिका घेतो याकड़े सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंनी मौन सोडले आहे. आणि महाराष्ट्रात CAA लागू होऊ देणार नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.

CAA ला विरोध करणारे राज्य

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आल्यानंतर देशात अनेक ठिकाणी याला विरोध करण्यात आला. या विरोधात आंदोलनेही झाली. केरळ राज्यसरकारने नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. नागरिकत्व कायद्याविरोधात आव्हान याचिका दाखल करणारे केरळ हे पहिलं राज्य ठरलं आहे. याव्यतिरिक्त देशातील अनेक राज्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2020 09:54 AM IST

ताज्या बातम्या