लोकसभा निवडणूक: आणखी एक सर्व्हे समोर; मोदी Vs राहुल, कुणाची आहे हवा?

लोकसभा निवडणूक: आणखी एक सर्व्हे समोर; मोदी Vs राहुल, कुणाची आहे हवा?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएसाठीही या सर्व्हेतील निष्कर्ष फारसा आनंद देणार नाही.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. अशातच काही ओपिनियन पोलमधून देशातील जनतेच्या मनात काय चाललंय, याबाबतचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता एका खासगी वृत्तवाहिनी आणि सी-वोटर यांनी लोकसभा निवडणुकांबाबत केलेला सर्व्हे समोर आला आहे.

कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्व्हेनुसार, देशात भाजपप्रणित एनडीएला 261 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे पुन्हा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मोदींसाठी हा धक्का आहे. कारण बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असते.

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएसाठीही या सर्व्हेतील निष्कर्ष फारसा आनंद देणार नाही. कारण युपीएला फक्त 143 जागांचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांच्या जागांमध्ये मात्र लक्षणीय वाढ झाली असल्याचं चित्र आहे. इतर पक्षांना 139 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही एक असाच ओपिनियन पोल समोर आला होता. एका मराठी वृत्तवाहिनीच्या ओपिनियन पोलमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीला 48 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर 2014 च्या निवडणुकीत ही टक्केवारी 49 टक्के एवढी होती. महाराष्ट्रात एनडीएचा दबदबा कायम राहील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय होत त्या ओपिनियन पोलमध्ये

शिवसेना - भाजपनं युती केली असली तरी त्याचा फायदा मात्र दोन्ही पक्षांना होणार नाही.  एका खासगी वृत्तवाहिनी आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. राज्यात 45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवसेना - भाजपला मोठा धक्का बसणार आहे. कारण, लोकसभा निणडणुकीमध्ये भाजप 21, शिवसेना 14 आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला 6 ते 7 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकडेवारी पाहता 2014च्या तुलनेत मात्र एनडीएचा आकडा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे हा भाजप - शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणूक 2019 टक्केवारी (अंदाज)

एनडीए 48 टक्के

आघाडी 37 टक्के

अन्य 13 टक्के

वंचित बहुजन आघाडी 02 टक्के

लोकसभा निवडणूक 2014 टक्केवारी

एनडीए 49.6 टक्के

आघाडी 36.9 टक्के

अन्य 13.5 टक्के

मुंबईत युतीचीच हवा

लोकसभा निवडणुकीत मुंबईवर युतीचीच हवा कायम राहणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला. या अंदाजानुसार, मुंबईच्या निकालांमध्ये लोकसभा निवडणूक 2014चीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या सहाच्या सहा जागांवर युतीचे उमेदवार जिंकतील, तसंच आघाडीला यावर्षीही भोपळा फोडता येणार नाही, असा अंदाज ओपिनिय पोलमध्ये वर्तवला गेला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 : मुंबईची लढाई

उत्तर मुंबई मतदारसंघ : गोपाल शेट्टी (भाजप) विरुद्ध उर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) (संभाव्य)

उत्तर पश्चिम मतदारसंघ : गजानन कीर्तीकर विरुद्ध संजय निरुपम (कॉंग्रेस)

उत्तर पूर्व मतदारसंघ : किरीट सोमैया (भाजप) (संभाव्य) विरुद्ध संजय पाटील (राष्ट्रवादी)

उत्तर मध्य मतदारसंघ : पूनम महाजन (भाजप) विरुद्ध प्रिया दत्त (कॉंग्रेस)

दक्षिण मध्य मतदारसंघ : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस)

दक्षिण मुंबई मतदारसंघ : अरविंद सावंत (शिवसेना) विरुद्ध मिलिंद देवरा (कॉंग्रेस)

मुंबईतील या सहाच्या सहा जागांवर युतीचेच उमेदवार जिंकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

First published: April 2, 2019, 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading