'मी पाच वर्षे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे अनेक जिवाभावाचे सहकारी लाभले आहे. पालकमंत्र्यांच्या नात्याने आपल्या भेटीगाठी होत होत्या. शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष दिले पाहिजे, पण हवामान खात्याचे अंदाज हे सारखे चुकत आहे, असं म्हणत असताना अजित पवार पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी म्हणाले होते. त्यामुळे अजितदादांचं भाषण सुरू असताना त्यांच्या विधानामध्ये सुधारणा करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांना एक चिट्ठी पाठवली आणि जिल्हाधिकारी नव्हे तर पालकमंत्री असं हवं असं सांगितलं. प्रेग्नेन्सी चर्चेदरम्यान Kajal Aggarwal ने दाखवला ग्लॅमरस अवतार; फोटोंनी वेधलं भाषण सुरू असताना अजितदादांनी चिठ्ठी वाचली आणि जिल्हाधिकारी म्हणालो का, आता एवढं कुठं शिकलोय मी, मी आपला पालकमंत्री होतो. खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली हो, मागे फार मोठी चूक झाली होती, त्याची खूप मोठी किंमत चुकवली होती. तेंव्हापासून कानाला खडा लावला. चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे बसलो आणि साहेब चुकलो, साहेब चुकलो, असं म्हणालो, अजितदादा असं म्हणताच सभेत एकच हश्शा पिकली. त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे बघून हात जोडत साहेब चुकलं असं म्हणत चुकीची कबुली दिली.#सातारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भरसभेत माफी pic.twitter.com/l56Ag0oC80
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, अजित पवार, सातारा