मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भीषण अपघाताचा थरार; ट्रकच्या धडकेत बसचा चक्काचूर, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

भीषण अपघाताचा थरार; ट्रकच्या धडकेत बसचा चक्काचूर, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

यवतमाळवरून औरंगाबादच्या दिशेनं जाणाऱ्या एका बसला बुलडाण्यात भीषण अपघात झाला आहे. (फोटो-टीव्ही9)

यवतमाळवरून औरंगाबादच्या दिशेनं जाणाऱ्या एका बसला बुलडाण्यात भीषण अपघात झाला आहे. (फोटो-टीव्ही9)

Bus-Truck Accident: यवतमाळवरून औरंगाबादच्या दिशेनं जाणाऱ्या एका बसला बुलडाण्यातील देऊळगाव राजा (Bus Truck accident in Buldhana) याठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

बुलडाणा, 23 ऑगस्ट: यवतमाळवरून औरंगाबादच्या दिशेनं जाणाऱ्या एका बसला बुलडाण्यातील देऊळगाव राजा (Bus Truck accident in Buldhana) याठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, बसचा काही भाग चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी अपघातात एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू (Elderly woman died on the spot) झाला आहे. तर अन्य 18 प्रवासी जखमी (18 passengers injured) झाली झाले आहे. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर देऊळगावा राजा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

संबंधित बस आज सकाळी यवतमाळ बस स्थानकातून औरंगाबादच्या दिशेनं जात होती. यावेळी बसमध्ये जवळपास 25 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान आज दुपारी एकच्या सुमारास संबंधित बस बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथून मार्गक्रमण करत होती. याचवेळी एका भरधाव ट्रकनं बसला जोरात धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये बसचा पाठिमागचा भाग चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा-रात्रभर केली राखीची तयारी अन्..; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम

अपघात झाल्यानंतर आलेल्या मोठ्या आवाजानं परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला दिली. तसेच अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. यावेळी एका वयोवृद्ध आजीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. स्थानिकांनी विलंब न करता, मृत आजीसह सर्व जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या भीषण अपघातात 18 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा-डोक्यात खुर्ची घालत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; लेकांनी जन्मदातीला दिल्या नरक यातना

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केली नसून घटनेचा तपास केला जात आहे. अपघातात जखमी झालेले बहुतांशी प्रवासी रक्षाबंधन साजरा करून आपल्या गावी परत चालले होते. दरम्यान त्यांच्या बसला हा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Accident, Buldhana news