मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खासगी बसला सँट्रो कारची धडक, 3 जण जागेवरच ठार, तर एकाने रुग्णालयात सोडले प्राण

खासगी बसला सँट्रो कारची धडक, 3 जण जागेवरच ठार, तर एकाने रुग्णालयात सोडले प्राण


कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा  अपघात झाला.

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला.

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला.

  • Published by:  sachin Salve

अहमदनगर, 28 डिसेंबर : अहमदनगर (Ahamadnagar )जिल्ह्यात पाथर्डी (Pathardi) तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा  अपघात झाला. सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्रमांक एम.एच. 38 x 8555 ही पुण्याहून नांदेडकडे जात असताना सँट्रो कार क्रमांक एम.एच. 12 सीडी 2917 ही पुण्याच्या दिशेने जात असताना धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात सँट्रो कारचा जागीच चुराडा झाला. यामध्ये सँट्रो कारमधील 3 जण जागीच ठार झाले. स्थानिकांनी तातडीने जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

रामभाऊ शंकरराव कदम, (वय 60, रा जायगाव ता.परळी जि. बीड) परमेश्वर लक्ष्मण काळे (वय 40, रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी) आणि केशव विठ्ठल बोराटे (वय 23 रा मंठा जि जालना) अशी मृतांची नावं आहेत.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर बस आणि ट्रकला अपघात

दरम्यान,  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 37 पुण्याहुन मुंबई कडे जाणारी ऑरेंज ट्रॅव्हल्स या खाजगी बस ने पुढे जाणाऱ्या एका मालवाहु ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. अपघातात बसमध्ये असणाऱ्या 15 प्रवाशांपैकी आठ जण किरकोळ जखमी झाले असून चालक तसेच अन्य एक जण  गंभीर जखमी झाला आहे.  सर्व प्रवाशांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published: