मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऐन दिवाळीत काळाचा घाला, 40 फूट खोल दरीत ट्रॅव्हल्स कोसळून 6 जणांचा मृत्यू

ऐन दिवाळीत काळाचा घाला, 40 फूट खोल दरीत ट्रॅव्हल्स कोसळून 6 जणांचा मृत्यू

पुलाचा कठडा तोडून 40 फूट ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी

  • Published by:  Kranti Kanetkar
सातारा, 14 नोव्हेंबर : ऐन दिवाळीच्या दिवशी भीषण अपघात झाल्यानं महाराष्ट्र हादरला आहे. पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गोव्याला फिरायला जात असताना काळानं घाला घातला आहे. उंब्रज जवळील तारळी नदीजवळ हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्सनं गोव्याला जात असताना उंब्रज नदीजवळ ही गाडी अचानक कठडा सोडून 40 फूट खोल कोसळली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा-रस्त्याकडेला पडला होता भिकारी; पोलीस अधिकाऱ्यांनी गाडी थांबवली आणि बसला धक्का दिवाळीच्या पहिल्या दिवशी साताऱ्यात वाशीवरून गोव्याला जाणाऱ्या 6 जणांवर काळाचा घाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या तारळी पुलाचा कठडा तोडून 40 फूट ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि 3 वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य असून जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Satara

पुढील बातम्या