मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नियंत्रण सुटलं अन् घात झाला; धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

नियंत्रण सुटलं अन् घात झाला; धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

बसचा अपघात

बसचा अपघात

धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस पलटल्यानं अपघात झाला आहे. चाळीसगाव -अक्कलकुवा बस धुळे-चाळीसगाव मार्गावर पलटी झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Dhule, India
  • Published by:  Ajay Deshpande

धुळे, 1 डिसेंबर : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे.  धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस पलटल्यानं अपघात झाला आहे. चाळीसगाव -अक्कलकुवा बस धुळे-चाळीसगाव मार्गावर पलटी झाली. या अपघातामध्ये एकूण 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस पलटी झाल्याचा अंदाज आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव -अक्कलकुवा बस धुळे-चाळीसगाव मार्गावर पटली झाली आहे. चालकावरील बसचा ताबा सुटल्यानं बस पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

First published:

Tags: Accident, Dhule, St bus