एसटी बस घाटात कोसळून मोठा अपघात, 25 जण जखमी

एसटी बस घाटात कोसळून मोठा अपघात, 25 जण जखमी

अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 1 महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 28 डिसेंबर : संगमेश्वर तालुक्यातील नायरी इथल्या घाटात एसटी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 1 महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

नायरी घाटात बसने तीन पलट्या घेतल्या. त्यामुळे बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आता प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील एक महिला प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत बस अपघाताचं प्रमाण वाढलं असल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्द्या ऐरणीवर आला आहे. याबाबत आता एसटी प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात येते, हे पाहावं लागेल.

SPECIAL REPORT : राजकारणातल्या 'जाणता राजा'वर खरमरीत टीका

First published: December 28, 2018, 9:54 AM IST

ताज्या बातम्या